Home ताज्या घडामोडी चांदुर बाजारात ४६ किलो गांजासह ५ आरोपीनां अटक

चांदुर बाजारात ४६ किलो गांजासह ५ आरोपीनां अटक

चांदूर बाजार 

स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत,खरवाडी गावा नजीक ,सापळा रचून ४६ किलो ३००ग्राम गांजा पकडण्यात आला.याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत,५लाख ५५ हजार ८४०रूपये इतकी आहे.या गांजा
तस्करीत पाच जणांना अटक करण्यात आली.या गांजा तस्करीची साखळी जिल्हाभर पसरली असून,यात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात,तस्करीचा गाजा येत असल्याची माहिती एस.पी.पथकाला होती.त्यानुसार या पथकातील अधिकारी, गांजा तस्करांच्या पाळतीवर होती. १८डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहिती वरून, संबंधीत तस्करांचे मोबाईल वरून लोकेश तपासण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील खरवाडी येथे सापळा लावून, सकाळी ११ ते १२ चे दरम्यान दोन मोटरसायकल वरून तस्करीचा गांजा पकडण्यात आला.यात गांजा सह ६०हजार रूपये किंमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. याप्रकरणात एकूण ६ लाख१५ हजार ८४० रूपयाचा , मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली.अटक झालेल्यां मध्ये, सुरज अविनाश शेळके उर्फ सुरू वय ४० रा चांदूर बाजार,जावेद अली मिर आली वय ३० रा चांदूर बाजार, शेख वशीम शेख करीम वय २७ रा अमरावती,कृष्णा गोंड वय २२ , दिपक नेमाडे वय ३० दोन्ही रा कुहरा काकडा ता. मुक्ताईनगर.जि.जळगाव यांचा समावेश आहे. तालुक्यात होणारी गांजा तस्करी ही, आंध्रप्रदेश मधील वरंगल व तामिळनाडू मधील विशाखापट्टणम येथून होत असल्याचा पोलीसांचा कयास आहे.आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई साठी, चांदूरबाजार पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक तपण कोल्हे यांच्या मार्गदर्शनात,स.पो.नि.अजय आखरे, हे. काॅ. मनोज, सुनिल,सैयद अजमल,पंकज फाटे,स्वप्निल तवर, योगेश, मंगेश, रविंद्र,यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments