Home ताज्या घडामोडी मोदींजींचा पुन्हा 'असत्याग्रह' : राहुल गांधींची टीका

मोदींजींचा पुन्हा ‘असत्याग्रह’ : राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला,” अशी टीका करतानाच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कृषी कायद्यांसंदर्भात सल्लाही दिला आहे. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील किसान संमेलनात संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकास्त्र सोडलं.

देशात कृषी कायद्यांवरून घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहे. १५-२० दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलं आहे. कृषी कायदे मागे घेण्याची व हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात किसान संमेलनात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments