Home वन निवासी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी अर्ज करा: मिताली सेठी

निवासी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी अर्ज करा: मिताली सेठी

अमरावती

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत 2021-22 या वर्षासाठी पहिली व दुस-या इयत्तेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छूक पालकांनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

याबाबतचे अर्ज धारणीच्या प्रकल्प कार्यालयात 29 डिसेंबरपासून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याच्या पालकाने अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमाल एक लक्ष रूपये असावे व तसे तहसीलदारांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बालकाचे वय सप्टेंबर 2021 पर्यंत सहा वर्षे पूर्ण हवे. विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या व दारिद्य्ररेषेखालील पालकांच्या पाल्यांना प्राधान्य मिळेल. शासकीय- निमशासकीय नोकरदारांच्या पाल्यांना लाभ मिळणार नाही.

अर्जासह पालकाचे संमतीपत्र, विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो, जन्मतारखेचा दाखला, वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2021 अशी आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश निश्चित झाल्यावर शाळा बदलता येणार नाही. तसे हमीपत्र तत्पूर्वी पालकांनी देणे आवश्यक आहे.

धारणी प्रकल्प क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी आपल्या पाल्यांना नामांकित निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी अर्ज करून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती सेठी यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments