Home ताज्या घडामोडी आमदार सुलभा खोडके यांच्या शेतातून गौण खनिजांची चोरी

आमदार सुलभा खोडके यांच्या शेतातून गौण खनिजांची चोरी

अमरावती

आमदार सुलभा खोडके यांच्या शेतातून गौण खनिजांची चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. महसूल विभाग आणि बडनेरा पोलिसांनीं छत्री तलाववाच्या मागे मंगलधाम परिसरात असणाऱ्या खोडके यांच्या शेतात मोठी कारवाई करून तीन ट्रक, दोन ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली.

अमरावती शहरालगत असणाऱ्या शेतांमध्ये तसेच खुल्या जागेवरील गौण खणीज गत अनेक वर्षांपासून चोरी जात आहे. चक्क आमदारांच्या शेतातील गौण खणीज चोरी होत असल्याची तक्रार प्राप्त होताच तहसीलदार संतोष काकडे आणि बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पंजाब वंजारी यांच्या नेतृत्वात महसूल विभाग आणि पोलिसांचा ताफा सकाळीच शेतात धडकला. यावेळी आमदार सुलभा खोडके यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके हे सुद्धा शेतात पोचले. यावेळी तीन मिनी ट्रक आणि दोन ट्रॅक्टर, तीन दुचाकींसह 15 जणांना ताब्यात घेतले. महसूल प्रशासनाच्यावतीने दिलेल्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी कलम 379,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणची चौकाशी सुरू आहे. गौण खनिजांची शहरालगत सर्वत्र मोठ्या प्रमाणात चोरी होत असून पहिल्यांदाच ही कारवाई झाली आहे.

संजय खोडके यांनी तलाठ्याला झापले

तुम्हला किती पैसे मिळतात इकडे ट्रॅक्टरवल्यानं सोडायला असा सवाल यावेळी संजय खोडके यांनी तलाठ्याला विचारला. मी मागच्यावेळी पोलिसात तक्रार दिली असे तलाठ्याने म्हणताच तक्रार दिली तर उपकार केलेत का माझ्यावर आशा शब्दात संजय खोडके यांनी तलाठ्याला झापले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments