Home Uncategorized शिक्षण झाले निरंकुश

शिक्षण झाले निरंकुश

 

प्रा. शिल्पा चौधरी पाचघरे

आज शिक्षण क्षेत्रात कोणाचाही कोणावर अंकुश नाही. सरकारही निरंकुश आहे.संस्था चालक भरमसाठ शुल्क विद्यार्थ्यांची पालकांना सांगत आहे. शुल्क न दिल्यास शाळा विद्यार्थ्याला व्हाट्सएप ग्रुप मधून काढून टाकू अशी धमकी देतात व बरेच विद्यार्थी व्हाट्स अँप ग्रुप मधून काढले आहे.
आज कोरोना संकट ,या जागतिक महामारीत अनेकांचे रोजगार गेलेते,अनेकांनच्या हाताला काम नाही, घरच्या मूलभूत गरजा जेमतेंम पूर्ण होतात.अश्यात शाळेची फि करिता तकादा कितपत योग्य आहे.कोरोना काळात शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड़ यानी वक्तव्य केल की कोरोना काळात शाळा जो पर्यंत नियमित होत नाही ,तो पर्यंत पालकानी शुल्क भरू नये. राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू यांना शुल्क प्रकरण कळले आले. मात्र ते यावर कारवाई न करता ,पालकांची दिशाभूल करत आहे. या सरकारमध्ये कोणाला कोणाचा धाक नाही,यावरून निरंकुश व दिशाभूल करणारे सरकार आहे हे सिध्ध झाले..खाजगी शाळा,सस्था चालक शुल्काचे आदेश देतात . सर्व आपल्या मनाचे व फायद्याचे कारभार चालत आहे.शिक्षण संस्था ना राज्य सरकारने पाठीशी घालू नये. या कोरोना काळात पालकांच्या पाठीशी उभे राहने गरजेचे आहे.शाळेची भारमसाठ शुल्क पालक भरणार कुठून, सरकारने पालकांना व विद्यार्थ्यांना आश्वास्त करायला हवे ,आधार द्यायला हवा.

सर्व शिक्षण प्रणाली नीरस आहे.ऑनलाइन शिक्षण कितपत यशस्वी आहे यावर प्रशन चिन्ह आहे.ग्रामीण भागात अजूनही मुलान जवळ मोबाइल नाही ,कनेक्टीव्हिटी नाही, कसे शिकतील मूल ..ऑनलाइन शिक्षणाकरिता शिक्षकांना योग्य त्या पद्धतीने ट्रेनिग देऊन मग मुलांना ऑनलाइन शिकवायला हवे होते आज नव्वद टक्के 90% विद्यार्थ्यांच नुकसान होत आहे ,फि दिली नाही तर व्हाट्स एप्प ग्रुप मधून काढते .मुलांनी किती दिवस सहन करून, दबावात शिक्षण घ्यावे ,मुलांच्या आरोगयावर विपरीत परिणाम होत आहे.डोळ्यांचे आजार,मानसिक त्राण या सारख्या आजाराला विद्यार्थी समोरे जात आहे.मुलांच्या भविष्याचा विचार करून या सरकारने यात योग्य त्या पद्धतीने लक्ष घालावे ,व ही ढासळलेली शिक्षण प्रणाली सुधारावी.खाजगी शिक्षण संस्थाच्या शुल्क आकरण्यावर अंकुश लावावा, विद्यार्थ्या च्या हिताचे निर्णय घेऊन शिक्षण प्रणाली कशी मजबूत व सक्षम करता येईल. सरकारने यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments