Home ताज्या घडामोडी कोरोना पुन्हा आक्रमक; बरं होणाऱ्यांची संख्या घटली

कोरोना पुन्हा आक्रमक; बरं होणाऱ्यांची संख्या घटली

मुंबई
महाराष्टात कोरोना पुन्हा आक्रमक झाला असून कोरोनातून बरं होणाऱ्यांच्या संख्यात घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात शनिवारी दिवसभरात ३,९४० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३,११९ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, “राज्यात आज ३,९४० करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,११९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७,८१,८४१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,०९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१४ टक्के झाले आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाचा मृत्यूदर २.५७ टक्के झाला आहे. आजपर्यंत १,२०,५९,२३५ नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच सध्या ५,००,३६० रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४,०२० लोक इन्स्टिट्युशनर क्वारंटाइन आहेत.आणखी काही दिवस खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाद्वारे करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments