Home ताज्या घडामोडी शिवसेनेसारखं करू नका; जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करा

शिवसेनेसारखं करू नका; जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करा

चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील भाजप नगरसेवकांना सल्ला

पुणे

निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं. १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने करोना काळात अवाढव्य वीजबिलं दिली, शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचं वीजबिल दिलं. अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, आपण जन्येला दिलेला शब्द पाळायचाच असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला. पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्यात पाटील बोलत होते.

भाजपा नगरसेवकांना सल्ला देताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पुण्यातील उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेवर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले की, शिवसेनेनं निवडणुकीआधी १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं आश्वासन पाळलं नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.
निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. जनतेला दिलेल्या आश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील. असा सल्ला दिला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments