Home ताज्या घडामोडी भारत पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानला भीती

भारत पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानला भीती

इस्लामाबाद

भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यापर्यंतच्या प्रत्येकाच्या वक्तव्यांवरून याची प्रचिती येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मागोमाग एक ट्वीट करत आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सतर्क केलं आहे. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अबुधाबी मध्ये भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो असा दावा केला होता. तसंच याबबात आपल्याकडे पुरावेही असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

“जर भारत पाकिस्तानविरोधात बनावट फ्लॅग ऑपरेशन करेल तर पाकिस्तान त्याच पद्धतीनं भारताला प्रत्येक स्तरावर उत्तर देईल हे मी आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगू इच्छिचतो. कोणतीही चूक करण्यात येऊ नये,” असं ट्वीट इम्रान खान यांनी केलं होतं. “भारतात अंतर्गत वाद वाढत आहेत. आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचं आदोलन, करोना महासाथीचा अयोग्यरित्या सामना करणं, मी आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा देतोय की या वादांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत पाकिस्ताविरोधात खोट्या मोहिमा चालवत आहे,” असंही ते म्हणाले.

इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या सूरात सूर मिसळून भारतातनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. तसंच सीमेवर संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर गोळीबार केला. यावरुन भारताला आंतरराष्ट्रीय नियमांचा किती आदर आहे हे दिसून येत असल्याचंही इम्रान खान म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments