Home ताज्या घडामोडी  आता शेतकरी करणार उपोषण; टोल देण्यासही नकार

 आता शेतकरी करणार उपोषण; टोल देण्यासही नकार

दिल्ली
नव्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. गत अनेक दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा करण्यात आली. परंतु त्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, सोमवारी शेतकरी ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी उपोषणला बसणार असल्याची माहिती स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली. तसंच शेतकरी नेते जगजीत सिंग यांनी हरयाणाचे शेतकरी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान टोलही देणार नसल्याची माहिती दिली.

२३ डिसेंबर रोजी शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. परंतु यावेळी शेतकरी दिवसापूर्वीच शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शेतकरी दिवसाच्या दिनी लोकांनी आपल्या घरी दुपारचं जेवण तयार करू नये, असं आवाहन राकेश टिकैत यांनी देशवासीयांना केलं आहे. तर दुसरीकडे किसान एकता मोर्चाचं फेसबुक पेजही बंद झालं आहे. फेसबुकनं कम्युनिटी स्टँडर्डचा हवाला देत पेज बंद केलं आहे. यानंतर किसान एकता मोर्चानं ट्वीट करत जेव्हा लोकं आवाज उठवतात तेव्हा ते हेच करू शकतात असं म्हणत टीका केली.

कृषी कायद्याला विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांना आता शिवसेना हिंदचंही समर्थन मिळालं आहे. शिवसेना हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत शर्मा यांनी २१ डिसेंबर रोजी १२ राज्यांतील ६० जिल्ह्यांमध्ये कँडल मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच केंद्र सरकारनं हे कायदे मागे घेतले नाहीत तर शिवसेना हिंदचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमधून कँडलमार्च काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments