Home विदर्भ दृष्टी परतली जगण्याची आशाही निर्माण झाली; सुनील कांबळे यांच्या आयुष्यात हरिना...

दृष्टी परतली जगण्याची आशाही निर्माण झाली; सुनील कांबळे यांच्या आयुष्यात हरिना फाउंडेशन ठरले वरदान

अमरावती

अचानक आलेल्या अंधत्वामुळे बडनेरा येथील रहिवासी सुनील कांबळे हा व्यक्ती खचून गेला. आत्महत्या करावी असे नकारात्मक विचार त्याच्या मनात घोळत असताना हरिना फाउंडेशन त्याच्यासाठी वरदान ठरली. हरवलेली दृष्टी सुनीलला मिळली सोबतच जगण्याची नवी आशाही त्याच्या नात नव्याने निर्माण झाली.

 

दृष्टी गेल्यावर खचलेल्या सुनील कांबळे यांच्या परिचित असणाऱ्या नांदा वासनिक यांनी सुनीलची भेट हरिना फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत पोपट यांच्याशी करून दिली.चंद्रकांत पोपट यांनी हरिना फाउंडेशन अंतर्गत स्व. मंगलजभाई पोपट नेत्रल्याच्या माध्यमातून सुनील कामडे यांची नेत्रातज्ज्ञ डॉ. पंकज लांडे यांनी सुनील कामडे यांची तपासणी केली. यावेळी दृष्टी परत येण्याची शाश्वती केवळ 5 टक्के असल्याचे डॉ. पंकज लांडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान हरिना फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी सुनील कांबळे यांचा इलाज करायचाच असा निश्चय केला. डॉ.पंकज लांडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून योग्य शस्त्रक्रिया केली आणि सुनील कांबळे यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. हरिना फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी, यांच्यासह राजप्रकाश गिलडा, राजेंद्र वर्मा, राजेंद्र भन्साली, सुरेंडे पोपली, शरद कसट, निलेश चिठोरे, मनीष सावला, सुरेश जैन, ओम खेमचंदनी, प्रा. मुकेश लोहिया, कमलकीशोर मालानी, अशोक राठी, पप्पू गागलानी, अजय टाके, भरती मोहकार यांनी या सुनीलला दृष्टी मिळावी यासाठी योगदान दिले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments