Home ताज्या घडामोडी अचलपूर बाजार समितीतील कर्मचारी भरती प्रक्रियेत गैरप्रकार; सहाय्यक सचिव, शिपायासह तिघांविरूद्ध गुन्हे...

अचलपूर बाजार समितीतील कर्मचारी भरती प्रक्रियेत गैरप्रकार; सहाय्यक सचिव, शिपायासह तिघांविरूद्ध गुन्हे दाखल

अमरावती
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गतवर्षी करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रकरणात परतवाडा पोलिसांनी सोमवारी सहाय्यक सचिव मंगेश भेटाळू व सहकारी शिपायासह तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होताच सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

बाजार समितीचे सहाय्यक सचिव मंगेश सुभाषराव भेटाळू (रा. देवमाळी परतवाडा), शिपाई शैलेश शुक्ला (रा. केदार नगर क्रमांक २ देवमाळी, परतवाडा) व लता राकेश वाजपेयी (रा. पथ्रोट) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाडा पोलिसांनी त्यांचेविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांनी सदर प्रकरणासंदर्भात १७ डिसेंबर रोजी परतवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. चौकशीदरम्यान या प्रकरणाचे मूळ कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांनी बाजार समिती प्रशासनाला दिले होते. त्यावरून सोमवारी संबंधित कागदपत्रे हाती येताच गुन्हे दाखल करण्यात आले. येत्या सहा महिन्यात अचलपूर बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. असे असताना कर्मचारी भरतीत झालेला घोळ व गुन्हे दाखल झाल्याने बाजार समिती चर्चेत आली आहे.

अचलपूर बाजार समितीत २०१९ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे विविध पदे आॅनलाइन परीक्षा घेऊन भरावयाची होती. त्याकरिता विविध संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या. यादरम्यान भरती प्रक्रियेत सहाय्यक सचिव मंगेश भेटाळू व शिपाई शैलेश शुक्ला यांनी गैरप्रकार केल्याचे अचलपुर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले होते. तो अहवाल जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी बाजार समितीला पाठवून यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments