Home Uncategorized अमेरिकन नागरिकांसाठी 900 अरब डॉलर्सचे कोरोना पॅकेज ; बेरोजगार आणि गरजूंना मिळणार...

अमेरिकन नागरिकांसाठी 900 अरब डॉलर्सचे कोरोना पॅकेज ; बेरोजगार आणि गरजूंना मिळणार आधार

न्यूयॉर्क

कोरोनाचा फटका बसला असताना आता अर्थव्यवस्थांना पुन्हा उभारी देण्यासाठी अमेरिकेन संसदेने आपल्या नागरिकांसाठी 900 अरब डॉलर्सच्या कोरोना पॅकेजची घोषणा केली आहे. या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर (२२ हजार रुपये) आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे. सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही या आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाणार आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन हे २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. यापूर्वीच त्यांनी सत्ता हाती घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत. एका महिन्यात आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करु. याच कामासाठी बायडेन आता स्वत:ची टीम वाढवत आहेत. बायडेन यांनी ट्विटवरुन, “एका महिन्यात आम्ही सारं काही ठीक करण्यास सुरुवात करणार आहोत,” असं म्हटलं आहे. बायडेन यांच्या टीमनेही सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही जल आणि वायू प्रदुषणासंदर्भात जगातिक स्तरावर नेतृत्व करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. बायडेन यांनी करोना आर्थिक पॅकेज अमेरिकन नागरिकांना फायद्याचे ठरणार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकन संसदेने रविवारी ९०० अरब डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात एकमत असल्याचं सांगितलं. या निधीचा वापर करोना काळामध्ये सर्वाधिक फटका बसलेले व्यापारी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तसेच करोनाच्या लसीकरणासाठी केला जाणार आहेत. मागील बऱ्याच काळापासून या आर्थिक मदतीसंदर्भात चर्चा सुरु होती. अमेरिकन काँग्रेसनेही या आर्थिक मदतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. करोनामध्ये सर्वात वाईट परिस्थिती झालेल्या समाजातील खालच्या थरातील व्यक्तींना मदत करणे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निधी जाहीर करण्यासाठी बायडेन यांनी सहमती यापूर्वीच दर्शवली होती.

अमेरिकेतील या आर्थिक पॅकेजमधून बेरोजगार, गरजूंना मदत केली जाणार आहे. या सर्व पात्र लोकांना आर्थिक भत्ते दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधील काही भाग हा करोना लसीकरणासाठी वापरला जणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे यासंदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामांसाठी या निधीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments