Home ताज्या घडामोडी पुण्यात पुन्हा आला गवा

पुण्यात पुन्हा आला गवा

पुणे

पुण्यात पुन्हा एकदा गवा आला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.

यापूर्वी ९ डिसेंबरला पुण्यात गवा दिसला होता. जंगलातला गवा ९ डिसेंबर २०२० या दिवशी थेट पुण्याच्या कोथरूड भागात रस्त्यावर आला आणि एका अभूतपूर्व नाटय़ाला सुरुवात झाली. गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न, रेस्क्यू ऑपरेशन आणि सरतेशेवटी पकडल्यावर गव्याचा झालेला दु:खद मृत्यू असा सगळा घटनाक्रम घडला होता. यावेळी मात्र वनविभाग आणि पोलीस पूर्ण खबरदारी घेण्याबाबत चर्चा करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments