Home ताज्या घडामोडी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी करत शेतकऱ्यांने केली आत्महत्या

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी करत शेतकऱ्यांने केली आत्महत्या

अमरावती

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्याने संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने महाराष्ट्रा राज्यमंत्री माननीय नामदार बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार वय ५५ या शेतकऱ्याने धनेगाव येथील आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता, सदर शेतकऱ्याला सदर व्यापाऱ्यांनी शेतामध्ये दारू पाजून संत्रा विक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेऊन संत्रा व्यापाऱ्यांनी मारहाण केली. त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलीस पाटील व सदर शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलीस स्टेशनला दि. १८ डिसेंबर रोजी गेले असता त्याठिकाणी तक्रार कर्त्याला बी ट जमदार ठाणेदार यांनी मारहाण केल्याची मृत्युपूर्व चिठ्ठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावेअशोक भुयार यांनी लिहून अंजनगाव तालुक्यातील बोराळा गणपती मंदिराच्या परिसरातील एका शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. सदर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिक पोलीस स्टेशन अंजनगांवमध्ये जमले होते.हे प्रकरण संत्रा व्यापारी याने पैसे न दिल्याने घडल्याचा चिठ्ठी मध्ये उल्लेख आहे आहे.

पोलीस स्टेशन ठाणेदार व बिट जमादार यांचेवर गून्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली.यावेळी अप्पर पोलीस आयूक्त शाम घुगे हे अंजनगांव पोलीस स्टेशन ला तळ ठोकून आहेत.त्यांचे समोरच हा प्रकार घडून आल्याने पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज तपासून एक पोलीस कर्मचारी मृतक शेतकर्याला मारहान करतांना दिसून आल्याने गावकर्यांनी एकच गोंधळ घातला होता आलेल्या तक्रारकर्त्या लाच पोलिसांनी मारहाण केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी चीड निर्माण झाली होती.
संत्रा विक्रीच्या व्यवहारांमध्ये दोन व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध तसेच बीट जमादार दीपक जाधव यांच्याविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. मृतक शेतकऱ्याचा मुलगा गौरव अशोक भुयार अंजनगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव, शेख अमिन, शेख गफूर (दोघे संत्रा व्यापारी) राहणार अंजनगाव सुर्जी यांच्याविरुद्ध भादवि ३०६/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मोरे यांच्याकडे देण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले. मृतक शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने लिहिल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments