Home ताज्या घडामोडी 25 डिसेंबरला पंतप्रधान साधणार शेतकऱ्यांशी संवाद

25 डिसेंबरला पंतप्रधान साधणार शेतकऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 डिसेंबरला असणाऱ्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अयोध्येतील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमधली वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत.

२५ डिसेंबरला उत्तर प्रदेशातल्या अडीच हजार ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच ते कृषी कायद्यांचं महत्त्व शेतकऱ्यांना सांगणार आहेत. २५ डिसेंबरला किसान सन्मान निधीही वितरित केला जाणार आहे. उत्तर प्रदेशात या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

या कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकऱ्यांसोबत जोडलं जाण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांना जोडलं जाण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमावरुन विरोधक पुन्हा एकदा मोदींवर टीका करण्याची शक्यता आहे कारण दिल्लीच्या सीमेेवर पंजाब आणि हरयाणा या राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. कृषी कायद्यांना विरोध दर्शवत मागील २० दिवसांपेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरु आहे. अशात त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पंतप्रधान उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुढे करुन विरोधक आक्रमक होऊ शकतात.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments