Home ताज्या घडामोडी कोरोनाची दुसरी लाट ! ब्रिटनमध्ये खळबळ

कोरोनाची दुसरी लाट ! ब्रिटनमध्ये खळबळ

लंडन

दक्षिण आफ्रिकेतील कोविड १९ विषाणूशी संबंधित असलेला विषाणूचा आणखी एक प्रकार ब्रिटनमध्ये सापडला असल्याचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी जाहीर केले. कोरोनाची दुसरी लाट येणार असा इशारा आरोग्य विभागाने दिला असताना कोरोनाचा पुन्हा एकदा नवीन प्रकार सापडल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील विषाणूशी संबंधित विषाणूचे दोन रुग्ण सापडले आहेत. हा प्रकारही जास्त पसरणारा असून तो आणखी उत्परिवर्तनानंतर तयार झालेला असावा. या विषाणूचे दोन रुग्ण सापडले असून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. जे कुणी दक्षिण आफ्रिकेतून आले असतील किंवा तेथून आलेल्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी पंधरा दिवस विलगीकरणात राहावे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्बंध लागू केले आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाताळ सण साजरा करण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments