Home ताज्या घडामोडी पोप आले चर्चेत ! ...

पोप आले चर्चेत !
सोशल मीडियावर बिकनितील मॉडेलचा फोटो केला लाईक

लँडल

ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आहेत. पोप यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पुन्हा एकदा बिकिनी घातलेल्या एका मॉडेलचा फोटो लाइक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

23 डिसेंबर रोजी ‘मार्गोट’ नावाच्या एका बिकिनी मॉडेलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करुन पोप यांनी आपला फोटो लाइक केल्याचा दावा केला आहे. तिने शेअर केलेला स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.स्क्रीनशॉट शेअर करताना, “uhhh, पोप यांनी माझा फोटो लाइक केला?? पोप यांनी माझा फोटो लाइक केला म्हणजे मी आता स्वर्गात जाणार…”, असं मजेशीर ट्विट मार्गोटने केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच पोप यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ब्राझीलची बिकिनी मॉडेल नतालिया गरिबोटो हिचा तोकड्या कपड्यांमधील एक फोटो लाइक करण्यात आला होता. तो स्क्रीनशॉटही प्रचंड व्हायरल झाला, त्यानंतर नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यावर पोप यांच्या अकाउंटवरुन तो फोटो ‘अनलाइक’ करण्यात आला. पोप यांनी लाइक केलेल्या स्क्रीनशॉटवर “किमान आता मी स्वर्गात जाईन”, अशी मजेशीर प्रतिक्रिया नतालिया गरिबोटो हिने दिली होती. या घटनेची गंभीर दखल व्हॅटिकनने घेतली आणि इंस्टाग्रामकडे बिकिनी मॉडेलचा फोटो पोप यांच्या अकाउंटवरुन कसा लाइक झाला याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.दरम्यान, सोशल मीडियामध्ये हे दोन्ही स्क्रीनशॉट सध्या चांगलेच व्हायरल होत असून यामुळे जगभर चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments