Home ताज्या घडामोडी धनेगाव येथील शेतकरी आत्महत्येची होणार चौकशी : ना.बच्चू कडू

धनेगाव येथील शेतकरी आत्महत्येची होणार चौकशी : ना.बच्चू कडू

अमरावती

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अशोक भुयार व त्यांचे बंधू मृतक संजय भुयार यांच्या कुटुंबाला आज तातडीने महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन सदर परिवाराचे सांत्वन करून या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आमदार बच्चू कडू यांनी आश्वासन दिले.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अशोक भुयार व मोठ्या भावाचा आत्महत्येचा जबर धक्का बसून हृदयविकाराने त्याच दिवशी लहान भावाचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनांनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संत्रा व्यवहारात व्यापाराने केलेली फसवणूक आणि पोलिसांनी केलेली मारहाण यातून झालेल्या अपमानामुळे अशोक भुयार यांनी 22 डिसेंबर रोजी एका शेतात आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. सदर घटनेची गंभीर दखल घेत बच्चू कडू यांनी तातडीने गुरुवारी धनेगाव येथे सदर मृतक झालेल्या शेतकरी कुटुंबाला भेट देऊन संपूर्ण हकीकत जाणून घेतली.या लगंभीर प्रकरणाविषयी पत्रकारांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की, या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे संत्रा व्यवहारांमध्ये व्यापार्‍यांनी केलेली शेतकऱ्यांची फसवणूक मारहाण या बद्दल संबंधित व्यापारी व पोलिसांविरुद्ध 420 चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून सदर कर्मचार्‍याला त्वरित निलंबित करण्याचे तसेच संबंधित ठाणेदार विरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ना. बच्चू कडू यांनी सदर कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आधार दिला. यावेळी मोठ्या संख्येने धनेगाव गावातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर आमदार बच्चू भाऊ कडू यांनी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात भेट देऊन त्याठिकाणी मृतक शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही मधील फुटेज पाहिले.

याप्रकरणी उपस्थित पोलिस अधिकारी व तहसीलदारांना योग्य त्या सूचना ना. बच्चुभाऊ कडू यांनी दिल्यात. या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी काही चालढकल केल्यास त्या अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही अशी तंबी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments