Home ताज्या घडामोडी  हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या

 हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या

हुंड्यासाठी छळ; डॉक्टर महिलेने केली आत्महत्त्या

नागपूर

हुंड्याच्या मागणीसाठी सतत होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेनेगळफास लावून आत्महत्या केल्याने नागपूर शहारत खळबळ उडाली.
रुची मंगेश रेवतकर असे गळफास घेतलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. नरेंद्र नगरच्या उपेंद्र अपार्टमेंट येथील ती रहिवासी होती. मृत महिलेचा पती देखील डॉक्टर असून त्याचे नाव मंगेश रेवतकर असे आहे. रुची यांना माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता, अशी तक्रार रुची यांच्या आईने केली आहे. या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

२०१६ मध्ये रुची आणि मंगेश यांचा विवाह संपन्न झाला होता. व्यवसायाने दोघेही डॉक्टर असल्याने त्यांचा संसार सुखाचा होईल, असे स्वप्न रुचीच्या आई वडिलांच्या बघितले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच मंगेश ने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. मंगेशने रुचीला माहेरुन पैसे आणण्यासाठी अनेक वेळा भाग पाडले होते. सुरुवातीला छोटी-मोठी नड असल्याचे समजून रुचीच्या आई वडिलांनी त्यांच्या मागण्यापूर्ण केल्या. त्यानंतर रुचीला मुलगा झाल्यानंतर नवऱ्याकडून त्रास होणार नाही, या आशेवर तिने पुन्हा संसाराला सुरुवात केली. मात्र मंगेश मधील लालचीपणा आणखीच वाढला होता. तो रुचीचा माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी सारखा त्रास देत होता. मारहाण देखील करायचा, हा प्रकार तब्बल चार महिने सुरू होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.पोलिसांना त्याठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली आहे. ज्यामध्ये तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराचा सविस्तरपणे उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुचीची आई अल्का सुरेश कवडे यांनी पोलीस ठाण्यात हु़ंडाबळीची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून डॉ.मंगेश रेवतकर विरुद्ध हुंड्याकरिता पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments