Home विदर्भ आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन

आदर्श पूर्व माध्यमिक शाळेत गणित दिवस साजरा; ऑनलाइन आयोजन

अमरावती
बालशिक्षण मंडळ खापर्डे बगीचा अमरावती द्वारा संचलित आदर्श पूर्व माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी ,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी गुगलमीटच्या माध्यमातून उस्फूर्तपणे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा केला .

गणित दिवसा निमित्त दैनंदिन व्यवहारातील गणित आपल्याला कोठे अनुभवायला येतात याचे छोटे-छोटे प्रात्यक्षिक तयार केले तसेच स्वतःच्या गणिताबद्दल च्या कविता, गणिताच्या नवीन पद्धतीच्या छोट्या ट्रिक करून त्याचे व्हिडिओ तयार केले आणि आपली कला ऑनलाइन पद्धतीने सादर केली शाळेच्या गणित शिक्षिका स्वामींनी आळशी व शीतल केने मॅडम मार्गदर्शनात आणि मुख्यधपिका स्नेहल विरुळार यांच्याध्यक्षतेत आयोजीत कार्यक्रमात मुलांनी गणित दिवस साजरा केला. यावेळी स्नेहल विरुळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना सांगितले गणिताशी मैत्री कशी करायची गणित अतिशय मजेशीर विषय आहे तो मजा घेत कसे शिकायचं याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या बद्दल माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सहभागी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवी मधून तन्वी खोडे, आदित्य लोखंडे ,आयुष्ष यावले,कृष्णा भस्मे ,अक्षरा वैराळे, पार्थ बडगे ,अनुष्का सुर्वे ,अनुष्का जामठीकर, मयूर गोटेफोडे ,रोहन किलेवाले ,वंदन भुयार ,आदित्य मोखडे ,अमेय जोशी ,अधिराज देशमुख, सार्थक बंड या विद्यार्थ्यांनी आपले प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे दाखवलेत त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मधून मनुश्री महल्ले ,ऊर्जा झंझाट ,रितेश मंडयान,वैभवीडोंगरे अंजली गौरकर ,कोमल कन्हेड ,आदिनाथ घोडेगावकर ,चैतन्य चौधरी ,विघ्नेश गायकवाड लतिका चौधरी, ऋषिकेश मराठे,अधिराज वानखडे, प्रणव पाटील ,यश गुलालकरी ,सुजल मुळे ,समीक्षा साळवे, शिवम काळमेघ यांनी सहभाग घेतला इयत्ता सातवी मधून भक्ती राजनकर ,कृष्णा बेलसरे, आरुषीउंबरकर ,संकल्प हीवे ,जाई लावरे ,विश्वास गभने ,ओम आढाव, सिद्धेश जगताप ,अंजली दाभाडे ,अनुश्री दारोकार ,श्रावण कुकडे, आनंद गिरी, समीर खंडारे ,आर्यि माहोरे ,पृथ्वी जावळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्साह आणि प्रेरणा देण्यासाठी शाळेच्या शिक्षिका रूपाली जोशी, राधिका सिद्धभट्टी, अश्विनी कुलकर्णी, कीर्ती कोहळे ,सौ खडसे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता महाजन, सचिव संध्या मराठे, मुख्याध्यापिका स्नेहल विरूळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments