Home ताज्या घडामोडी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान

9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा: पंतप्रधान

दिल्ली

केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेत आहेत. सरकारने ज्या योजना सुरु केल्या. त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेत आहेत.ओदिशामधील एका शेतकऱ्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, “किसान क्रेडिट कार्डचे खूप फायदे आहेत. खूप कमी दरात व्याज मिळते. तुम्ही इतर शेतकऱ्यांना याची माहिती द्या”

मोदींच्या संवादातील मुद्दे

– शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही.
– शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद हा सर्वांचा आनंद आहे.
– आधी पीक वाया जायचे आता विकले जाते.
– शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन भ्रम निर्माण केला जात आहे.

– आज रुपया चुकीच्या माणसाच्या हातात जातात नाही.
– आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो.
– संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही. हेच सुशासन आहे.
– देशातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतोय. पण फक्त एकमात्र पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकरी या योजनेचा लाभ मिळत नाहीय.
– कारण बंगालमधील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू देत नाहीय. यात राज्याला एक पैसा भरायचा नाहीय.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments