Home विदर्भ अधिकाधिक कापूस खरेदीसाठी पूर्वतयारी व नियोजन ; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर...

अधिकाधिक कापूस खरेदीसाठी पूर्वतयारी व नियोजन ; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

अमरावती

गेल्या दहा वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी गत हंगामात शासनाकडून करण्यात आली. यंदाही मोठी कापूसखरेदी होण्यासाठी पूर्वतयारी व नियोजनासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले.

आमदार बळवंतराव वानखडे, पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवत असताना शेतकरी हिताचे निर्णय व योजनांची अंमलबजावणीही भरीवपणे व्हावी यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या तत्काळ दूर करण्यात आल्या. पूर्वीची 18 जीनची संख्या आता 25 वर नेण्यात आली. त्यासाठी 10 कृषी पर्यवेक्षक उपलब्ध करुन देण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष पाठपुरावा करुन सीसीआयमार्फत केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळे कापूस खरेदीला वेग येऊन मोठी कापूस खरेदी झाली. शासन स्तरावरही या अडचणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शासनाकडून या अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या व राज्यात गत दशकातील सर्वात मोठी कापूस खरेदी झाली.

यंदाही अधिकाधिक कापूस खरेदी संदर्भात परिपूर्ण नियोजन होणे आवश्यक आहे. गोदामांची उपलब्धता, ग्रेडरची संख्या, साठवणूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक तयारी असावी. पणन महासंघाच्या सबंध कापूस खरेदीच्या दृष्टिने ज्या अडचणी असतील, त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments