Home ताज्या घडामोडी समोरा समोर भीती वाटत असल्याने कुलगुरूंना हवी ओलाईन सभा; सिनेट सदस्यांचा आरोप

समोरा समोर भीती वाटत असल्याने कुलगुरूंना हवी ओलाईन सभा; सिनेट सदस्यांचा आरोप

अमरावती

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे पूर्णतः अकार्यक्षम असून केवळ चमकोगिरीत आघाडीवर आहेत. आज महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेतल्या जात असताना विद्यापीठाच्या सिनेटची बैठक मात्र ऑनलाइन घेण्याचा कुलगुरूंच्या अट्टाहास आहे. विद्यापीठातील अनेक गैरप्रकारांमध्ये कुलगुरूंचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून सभागृहात समोरा समोर आपल्याला प्रश्न सिनेट सदस्य विचारतील, अशी भीती कुलगुरूंना वाटत असल्याने सिनेटची बैठक ऑनलाइनच होईल, अशी कुलगुरूंची चुकीची भूमिका असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. कुलगुरूपदाचा उरलेला 6 महिन्याचा कार्यकाळ डॉ. मुरलीधर चांदेकर यांना कसा बसा पूर्ण करून पळ काढायचा असल्याचेही सिनेट सदस्यांनी म्हटले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन गावंडे, डॉ. उत्पल टोंगो, डॉ. मानकर यांचेसह राजपाल नामनिर्देशित सदस्य प्रदीप देशपांडे, प्रा. विवेक देशमुख, डॉ. नितीन खर्चे यांनी पत्रपरिषदेत कुलगुरुंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. यावेळी डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले की, सिनेटची सभा ऑफलाईन अर्थात पारंपारिक पद्धतीने घ्यावी यासाठी कुलगुरुंना ३३ सिनेट सदस्यांनी निवेदन दिले होते, त्यावेळी सभा रद्द झाली होती. २९ डिसेंबरला होणारी अधिसभा पारंपारिक पद्धतीने होणार असल्याचे पत्र १८ नोव्हेंबर रोजी पात्र झाले. मात्र ही सभा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे पत्र विद्यापीठाने दिले आहे. सिनेट विद्यापीठाचे सर्वोच्च सभागृह आहेत. व्यवस्थापन परिषद देखील अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव सिनेटकडे पाठवित असते. तब्बल ९ महिन्यानंतर ही सभा होत आहेत. याठिकाणी सदस्य प्रश्न मांडून त्यावर चर्चा होत असते. विद्यार्थी व विद्यापीठाचे अनेक प्रश्न असतांना कुलगुरुंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश त्यांनी दाखविले आहेत. परंतु जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेत सुद्धा पारंपारिक पद्धतीने आमसभाझाल्या आहेत. मनपाचे ७० पेक्षा अधिक तर जिपचे ६५ सदस्य आहेत. विद्यापीठात तीन प्रशस्त सभागृह असतांना कुलगुरुंनी मुद्दाम ऑनलाईन सभा बोलाविली आहे. यामुळे नको असलेल्या सदस्यांना त्यांना म्यूट करण्याची सुविधा राहणार आहे. विद्यापीठाकडे परीक्षा व निकाल लावण्याची जबाबदारी आहे. यावेळी ८५ टक्के विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले असून केवळ १६ टक्के निकाल लागले असल्याचे सांगण्यात आले. कुलगुरुंनी विश्वास गमावला असून ते महोत्सव प्रिय असल्याची टिका त्यांनी केली. विकासात्मक कार्य करण्याऐवजी महोत्सवात फोटो काढणे कुलगुरुंना आवडत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी राज्यपाल नामनिर्देशित सिनेट सदस्य प्रदीप देशपांडे यांनी सांगितले की, आपले प्रश्न देखील कुलगुरुंनी नाकारले आहेत. त्यासाठी त्यांनी पत्र पाठवून व्यक्तीश: भेटण्याचे पत्रात नमूद केले आहे, ही आश्चर्याची बाब आहे. सभागृहात प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे. विद्यापीठाचा दर्जा खालावला असल्याचेही ते म्हणाले. व्यवस्थापन परिषद सदस्य उत्पल टोंगो म्हणाले की, प्रश्न नाकारतांना कुलगुरु तंत्रशुद्ध उत्तर देत नाही. प्रश्न नाकारल्यामुळे अधिकारांची पायमल्ली होत आहेत. त्यामुळे आम्ही सारे आपसी मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. प्रा. विवेक देशमुख म्हणाले की, कुलगुरुंनी आपले अनेक प्रश्न मुद्दाम नाकारले आहेत. प्रश्न नाकारतांना सिनेटमध्ये त्याबाबत माहीती देणे आवश्यक आहेत. परंतु ती प्रथा त्यांनी बंद केली आहे. याशिवाय आपल्या प्रश्नास नाकारतांना प्रश्न प्रश्नाप्रमाणे विचारला नसल्याचे हास्यास्पद कारण त्यांनी दिले आहे. त्यांच्यावर केलेली टिका देखील त्यांना सहन होत नसल्याचे प्रा. विवेक देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सिनेट सदस्य डॉ. भी.र. वाघमारे, प्रा. दिलीप कडू, प्रा.डॉ. अर्चना बोबडे आदी उपस्थित होते.

संचारबंदीचे अजब कारण

कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी नुकत्याच पाठविलेल्या पत्रात जिल्ह्यात ३१ तारखेपर्यंत रात्रीची संचारबंदी असल्याने सभा ऑनलाईन होत असल्याचे म्हटले आहे. परंतु विद्यापीठात दररोज एक हजार विद्यार्थी निकालासाठी येत असतांना कोव्हीडचा प्रसार होत नाही का असा प्रश्न डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी विचारला. यावेळी कलम १४४ चे उल्लंघन होत नाही का असेही ते म्हणाले.

10 पहिली 7 प्रश्न नाकारले

कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी 10 पैकी 7 प्रश्न नाकारले असून त्यांच्या सोयीचे केवळ 3 प्रश्न प्रश्नपत्रिकेत ठेवले आहेत. हा प्रकार योग्य नसल्याचे सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे.

राज्यपालांना देणार पत्र


सिनेटची बैठक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी ६५ पैकी ४० सदस्य सोबत असल्याचे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी म्हटले. उर्वरित २५ पैकी ९ कुलसचिव, प्र. कुलगुरु, अधिष्ठाता व अधिकारी आहेत. 40 सदस्यांनी सभा ऑफलाईन घ्यावी यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे. तक्रारींचे पत्र राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments