Home विदर्भ नगरपंचायत निवडणुकीकरिता चार निरिक्षकांची निवड; नगरपंचायत निवडणुकीकरिता चार निरिक्षकांची निवड

नगरपंचायत निवडणुकीकरिता चार निरिक्षकांची निवड; नगरपंचायत निवडणुकीकरिता चार निरिक्षकांची निवड

अमरावती
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आज शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पालकमंत्री यशोमती ठाकुर व यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींतमध्ये काँग्रेसचीच सत्ता आणण्यचे नियोजन यावेळी करिता याकरिता चार निरिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी कामाला लागण्याचे निर्देश यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले या बैठकीला माजी आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर यांच्यासह पक्षाचे निरिक्षक सुनिल कोल्हे व धनंजय देशमुख यांची उपस्थिती होती.

 

जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली नगर पंचायतीचा कार्यकाळ डिसेंबरला संपला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपताच नगरपंचायतीच्या निवडणुका लागण्याचे संकेत आहे. त्यामुळे निवडणुकीची पुर्वतयारी व नियोजन करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीने आज शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पदाधिकाऱ्याना मागदर्शन करून चारही नगरपंचायतींवर कॉग्रेसचाच झेंडा फडकविण्याबाबचे निर्देश दिले, तर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सत्ता प्राप्त करणेकरिता केलेल्या नियोजनाचे सादरीकरण करीत चारही नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा दावा केला शिवाय याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या. पक्षाकडुन सुनिल कोल्हे यांची नांदगाव खंडेश्वर व धारणी या नगरपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे तर धनंजय देशमंख यांच्याकडे तिवसा व भातकुलीची जबाबदारी देण्यात आली. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील प्रत्येकी एका नगरपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे. याकरिता त्यांच्या बैठका देखील तेथे लावल्या आहेत. यामध्ये तिवसा नगरपंचायतीची निरिक्षक म्हणुन जयंत देशमंख यांच्याकडे जबादारी सोपविण्यात आली आहे. ते 27 डिसेंबर तिवसा येथे रवीवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. याशिवाय गिरीश कराळे यांच्याकडे नांदगाव खंडेश्वरच जबाबदारी देण्यात आली असुन त्यांची बैठक २८ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता राहणार आहे. धारणीची जबाबदारी सभापती बाळासाहेब हींगणीकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांची बैठक २ जानेवारी दुपारी 2 वाजता राहणार आहे. भातकुली तालुक्याची जबाबदारी गणेश आरेकर यांच्याकडे देण्यात आली असुन ते ४ जानेवारी दुपारी २ वाजता बैठक घेणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, मुकद्दर पठाण, अतुल देशमुख, मुकुंद देशमुख,, अमोल धवसे, तसेच संजय लायदे,निशिकांत जाधव,परिक्षीत जगताप,पंकज मोरे, सिद्धार्थ बोबडे, उपस्थित होते,

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments