Home विदर्भ अंजनगाव ठाणेदार व बीट जमदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा: खा. नवनीत...

अंजनगाव ठाणेदार व बीट जमदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा: खा. नवनीत राणा

अमरावती
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यतील धनेगाव येथे २२ डिसेंबर रोजी पोलिसांनी मारहाण केल्यामुळे व आपला अपमान सहन न झाल्यामुळे अशोक भोयर या शेतकऱ्याने आत्महत्या केली व त्याचा धक्का घेतल्यामुळे लहान भावाला सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. आज या दोन्ही भावंडांच्या घरी सांत्वना भेटीसाठी आलेल्या जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा यांनी मृतकांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नोंद असलेली दोन नावे,अंजनगावचे ठाणेदार तथा त्यागावचा बीट जमदार यांचेवर आधी या तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली.
या प्रकरणात गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आमच्या युवा स्वाभिमान संघटने मार्फत आंदोलन करत, प्रशासनाला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू अशी भूमिका खासदार नवनीत राणा यांनी घेतली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ठाणेदार, बीटजमदार दोघांचे नामोल्लेख स्पष्टपणे असताना,प्रशासनाने फक्त एकाच मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांला तात्काळ निलंबित केले व त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला,परंतु पोलिस विभागाने चिट्ठीत उल्लेखीत ठाणेदारला मात्र मोकळे सोडले असल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागत असल्याचे गंध येत आहे,सर्वसाधारण पणे एखाद्याने आत्महत्या केल्यास त्याने चीठ्ठीत नामोलीखीत केलेल्या सर्व व्यक्तीवर पोलिस प्रशासन कारवाई करते त्याच न्यायाने या प्रकरणात ठाणेदारावरही का गुन्हे दाखल करण्यात आले नाही?असा प्रश्न खासदार .नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.

तहसीलदारांकडून चौकशी सुरू

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या भेटीत त्यांनी या प्रकरणाची समिती तयार करून चौकशी करण्याचे आदेश तहशीलदारांना दिले होते, त्यानुसार तहसीलदारांनी समितीद्वारे चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा या प्रकरणात कोण कोण दोषी आढळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments