Home ताज्या घडामोडी नकली गांधी आडनावाने कोणी "महात्मा" बनत नाही ! शिवराय कुळकर्णी यांचा यशोमती...

नकली गांधी आडनावाने कोणी “महात्मा” बनत नाही ! शिवराय कुळकर्णी यांचा यशोमती ठाकुरांवर पलटवार

अमरावती

आलूसे कभी सोना नही बनता.. नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही… सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, हे गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी ध्यानात घ्यावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि प्रियंका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरी हिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये. जो पक्ष एका घराण्याच्या गुलामगिरीच्या आणि चाटूगिरीच्या मानसिकतेत अडकला आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतःचेच तोंड स्वतःच्याच थुक्याने मलिन करण्याचा प्रकार असल्याची टीकाही शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर मुक्ताफळे उधळली आहेत. गांधी घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहोत, हे दर्शवण्याची स्पर्धा कॉंग्रेसजनांमध्ये कायम सुरू असते. त्यात यशोमती ठाकूर कायम आघाडीवर असतात. मोदींवर टीका करून काँग्रेसमध्ये आणखी वरचे पद मिळते, या अनुभवातून यशोमती ठाकूर आपल्या मंत्रीपदाची चुणूक दाखवण्या ऐवजी रोज नित्यनेमाने मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत असतात. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका. स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभही नाही. राज्यात रोज सर्वत्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रथम त्यावर लक्ष द्यावे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या व राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या समस्या सोडवून दाखवाव्या, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments