Home Uncategorized संकल्पपूर्ती : बादल व देवामुळे मिळाली कारिया कुटुंबाला नवी ओळख

संकल्पपूर्ती : बादल व देवामुळे मिळाली कारिया कुटुंबाला नवी ओळख

श्रीनाथ वानखडे
अमरावती
सर्वसाधारणतः एखाद्या सामान्य व्यक्तीचं स्वप्न म्हणजे घर…फार फार तर चार चाकी गाडी,पण सुर्जीतील शिवणकाम करणाऱ्या कुटुंबियांचे स्वप्न होते आपल्या घरी घोडे असावे.विपरीत परिस्थिती मुळे आपल्या हयातीत स्वप्न साकार न करू शकणाऱ्या टेलरच्या मुलांनी पित्याच्या मृत्यूपश्चात वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता केली.स्वप्नपूर्ती च्या तीन चार वर्षात मुलांचे भाग्य ही उजाडले.ही किमया साध्य झाली ती बादल व देवा नावाच्या घोड्यामुळे.आज या दोन घोड्यामुळे कारिया कुटुंबियांना अंजनगाव सुर्जी तालुक्यात नवीन ओळख प्राप्त झाली आहे.
मूळ गुजरातचे असलेले कारिया परिवार शंभर वर्षापूर्वी अंजनगाव येथे स्थिरावले. दिवंगत मगनलाल कारिया हे टेलरिंग व्यवसाय करून कसेबसे कुटुंबाचे पालनपोषण करायचे. मात्र परिस्थिती हलाखीची असली तरी त्यांची स्वप्ने मोठी होती.राजे-राजवाड्यात जसे रुबाबदार घोडे असतात तसे घोडे आपल्याकडे असावे हे त्यांचे स्वप्न.मात्र कुटुंब मोठे असल्याने व आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहून २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले.मगनलाल यांना ५ मुले.एक मुलगा शेतकरी,एक लेडीज टेलर,तिघे बांधकाम कारागीर. वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून पाचही भावंडानी मिळून २०१८ मध्ये अडीच लाखात एक घोडा (बादल) खरेदी केला.परिसरात रुबाबदार घोडा दिसत असल्याने गावात वारंवार कार्यप्रसंगी घोड्याची मागणी व्हायची पण वर्षभर त्यांनी मागणी कर्त्यांना नकार दिला.२०१९ मध्ये पुन्हा दुसरा घोडा(देवा)खरेदी केला.दोन्ही घोड्यांचा चारा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा म्हणून नाईलाजाने कार्यप्रसंगी घोडे भाड्याने देण्याचा निर्णय भावंडानी घेतला.गेल्या वर्षभरात करोडो रुपयांचा व्यवहार केवळ आपण ह्या घोड्यामुळे करू शकलो असल्याचे प्रमोद कारिया यांनी सांगितले.

घोड्याला भावाचे नाव
पंकजला शेतीकाम करतांना कायम साप व अन्य विषारी प्राणी दिसायचे मात्र बादल आल्यापासून त्याच्या जाणेयेण्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न मिटला.म्हणून दुसऱ्या घोड्याचे नाव देवा या भावाच्या नावावरून ठेवल्याचे गजानन कारिया यांनी सांगितले.

घोड्यासाठी स्पेशल प्लॉट

बादल व देवा मुळे आपली परिस्थिती सुधारली व परिसरात ओळख निर्माण झाली.सध्या राहते घरात जागा कमी असल्यामुळे बादल व देवा साठी १८०० फुटांचा नवीन प्लॉट खरेदी केला असल्याचे धनेश कारिया यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments