Home ताज्या घडामोडी संजय राऊत यांनी उगाच "डराव डराव" करू नये आशिष शेलार यांचा टोला

संजय राऊत यांनी उगाच “डराव डराव” करू नये
आशिष शेलार यांचा टोला

अमरावती

कर नाही त्याला डर कशाला ? संजय राऊत यांनी उगाच “डराव डराव” करू नये. दमबाजी तर बिलकुल करू नये. एका नोटिसनेच ते हादरले आहेत. त्यापेक्षा मुकाट्याने दाम – दमडीचा हिशोब ईडी कार्यालयात जाऊन द्यावा, असे आव्हान भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी दिले आहे.
ईडीने नोटीस पाठवल्या नंतर शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपाला दिलेल्या इशाऱ्यांवर आ. आशिष शेलार अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री प्राचार्य अशोक उईके, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते. संजय राऊत बोलतात ते तथ्यहीन आहे. एका नोटिसनेच ते हादरले आहेत. ईडीने नोटीस दिली आहे तर प्रथम त्यांनी दाम – दमडीचा हिशोब देऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही तर डर कशाचा ? डराव डराव करण्यापेक्षा हिशोब द्यावा. सीबीआय असेल, ईडी असेल अशा एजन्सीज वर दबावतंत्र टाकण्याचे काम शिवसेना सातत्याने करते आहे. यामुळे या एजन्सीजचे पावित्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. नाहक भाजपा नेत्यांकडे इशारा करून दमबाजी करू नये. संजय राऊत हे महाराष्ट्राचेच आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या परिवाराचाच एक भाग मानतो. म्हणून आमच्याही मनात त्यांच्याविषयी सहृदयता आहे. पण अशा दमबाजीने काय साध्य होणार, असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
कोणाच्या बायका – मुलांना नोटीस मिळाली तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगना राणावत चे घर बुलडोझर लावून पाडणे मर्दपणा होता का ? कंगना राणावत नामक एका महिलेला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ? असे प्रतिप्रश्न देखील आ. आशिष शेलार यांनी उपस्थित केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments