Home Uncategorized ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; अमरावती- नागपूर महामार्गावर अपघात

ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; अमरावती- नागपूर महामार्गावर अपघात

अमरावती

अमरावती-नागपूर महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील गिरनार होंडा शोरूम समोर हा अपघात झाला.

मनोज राजाभाऊ ढबाळे, असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून ऋषिकेश दादाराव घाटोळ असे जखमीचे नाव आहे. दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.
मनोज आणि ऋषीकेश दोघेही सकाळी दुचाकीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यानंतर दोघेही दुचाकी वाहनाने वाठोडा खुर्द येथे परत जात असतांना १८ चाकी मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिली. दुचाकी सह मनोज ट्रकच्या मागील चाकात आल्याने ताचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर मागे बसलेला ऋषिकेश गंभीररित्या जखमी झाला.अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वाहनांची गर्दी कमी करून जखमी ऋषीकेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मनोजच्या कुटुंबियांना मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नांदगांव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments