Home Uncategorized स्व. पांडुरंगजी कवडे यांची प्रेरणादायी संघर्ष गाथा 'मोर्णाकाठचा पांडुरंग' चे उद्घाटन 

स्व. पांडुरंगजी कवडे यांची प्रेरणादायी संघर्ष गाथा ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ चे उद्घाटन 

अकोला

माजी नगराध्यक्ष स्व. पांडुरंगजी कवडे काका स्मृती तथा कार्य गौरव समितीच्या वतीने स्व. पांडुरंगजी कवड यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात स्व. पांडुरंगजी कवडे यांची प्रेरणादायी संघर्ष गाथा “मोर्णाकाठचा पांडुरंग” चे उदघाटन आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. महापौर अर्चना मसने माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार. तुकाराम बिडकर ,प्रशांत देशमुख , हरीश आलीमचंदानी , अकोला महापालिका स्थायी अमिती सभापती सतीश ढगे डॉ. किशोर मालोकार,नानुभाई पटेल कृषी कीर्तनकार महादेव भुईभार . प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे प्रमुख म्हणून अतिथी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुर्यकांत कवडे यांनी केले. या शॉर्ट फिल्म ची निर्मिती डॉ. सुर्यकांत पांडुरंगजी कवडे यांनी केली. याप्रसंगी समाजसेवी अण्णा हजारे यांनी कार्यक्रमाला दिलेल्या शुभेच्छा पत्राचे तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

स्व. पांडुरंगजी लक्ष्मणराव कवडे यांनी अकोला नगर परिषदेत नगराध्यक्षपद सांभाळले आहे. ते सात वेळा नगरसेवक पदावर तर अकोला जनता बँकेचे मुख्य संचालक मंडळावर ते २५ वर्ष होते. १० टक्के लोकवर्गणी माफ करून अकोला शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी खेचून आणली होती. सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. एका साधारण कुटुंबातील असलेले पांडुरंग कवडे यांचा एक गिरणी कामगार ते नगराध्यक्ष हा संघर्षमय जीवन प्रवास नव्या पिढीला प्रेरणादायी असा आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा हा इतिहास नव्या पिढीसमोर शॉर्ट फिल्म च्या मांडण्यात आला आहे सोबतच अकोला नगरपालिकेचा सुवर्ण काळ सुद्धा पडद्यावर झळकला आहे.

स्व. पांडुरंगजी कवडे काका स्मृती तथा कार्य गौरव समितीचे सहसंयोजक डॉ. सूर्यकांत कवडे यांच्या सह सल्लागार समितीसह प्रा. राजाभाऊ देशमुख, ऍड. शरद गांधी, शौकत अली मिरसाहेब आणि हरिभाऊ काळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन अक्षय राऊत यांनी तर आभार प्रदर्शन निलेश कवडे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments