Home ताज्या घडामोडी कुलगुरु : एक परका माणूस

कुलगुरु : एक परका माणूस

कितीही झालं तरी मी परका आहे. मी अमरावतीचा नाही असे विधान खरं तर दुर्दैवी विधान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू कुठलेही संकटाचे चिन्ह दिसले की करतात. खरं तर भावनिक होण्याची ही त्यांची नाटकबाजी आता उघड झाली आहे. अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या कुलगुरूंविराधात एक, दोन नव्हे 40 सिनेट सदस्य एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात ही खर तर दुर्दैवी घटना आहे. हा असा प्रकार एक तर कुलगुरू
फारच देव माणूस असावेत किंवा देवाने हा असा कसा माणूस घडवला आशा श्रेणीतील कुलगुरू असावे ज्यामुळे त्यांचा गत काही दिवसांपासून सातत्याने उदोउदो होतो आहे.
सिनेटची बैठक 29 डिसेंबरला होणार आहे. ही बैठक ऑनलाइन होईल असे कुलगुरूंनी बैठकीच्या ऐन चार दिवस आधी जाहीर केल्याने सिनेट सदस्यांनी कुलगुरूंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये यावर बंदी घातली असल्याचे सांगत कुलगुरूंनी सिनेटची बैठक ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 60, 70 जणांच्या उपस्थिततीत होणाऱ्या बैठकीसाठी विद्यापीठात 200 ते 300 असनक्षमतेचे सभागृह असताना कुलगुरू सिनेट सदस्यांना सामोरे जायला घाबरत असल्याचा आरोप यानिमित्ताने होतो आहे. खरं तर या सर्व प्रकारामुळे कुलगुरूंची प्रतिमा ही पूर्णतः डागाळली गेली आहे. आणि यासाठी कुलगुरू हे स्वतःच जबाबदार आहेत. कुलगुरू म्हणून आता अवघा पाच-साडेपाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या थोड्या दिवसात आपल्या प्रतिमेला धक्का वगैरे बसू शकतो अशी भीती कुलगुरूंना वाटत असल्याने आपण सर्वांच्या दूर राहिलेलंच बरं यासाठी ते काळजी घेत आहेत. असं म्हणतात समाजात आपली प्रतिमा छानशी असावी यासाठी काही व्यक्तींना कुलगुरूंनी जाबाबदरी दिली आहे. हे असे अजब धंदे कुलगुरू असणारी व्यक्ती पण करू शकते त्यामुळे नवल वगैरे त्यात काही नाही. नवल एकच ज्या भाडोत्रीना अशी जबाबदारी सोपविण्यात आली त्यांची प्रतिमा नेमकी कशी आहे याचा अभ्यास मात्र कुलगुरूंना करता आलेला नाही. आता हा असा फालतू खटाटोप तोच करू शकतो ज्यांनी काही काळबेर केलं असाव. कुलगुरूंनी अस काही केलं असावं असं अजिबात वाटत नाही मात्र साद्या जे काही सुरू आहे त्यामुळे संशयाला नक्कीच जागा आहे. विद्यापीठाला लकवा झाला असा आरोप प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी केला. आता काही दिवसांपूर्वी कुलगुरूंनी प्रा. दिनेश सूर्यवंशी यांना व्यवस्थापन समितीतून बाहेर केलं. आपल्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांविरोधात कुलगुरू असा निर्णय घेतात. त्यांना आहेच ते अधिकार. या अधिकारांमुळे सिनेट सभेत कोणते प्रश्न घ्यायचे कोणते काढून फेकायचे हा सर्व अधिकर आहेच कुलगुरूंना. आणि त्यांनी हे असे अधिकार वापरलेतही.
विषय कुलगुरूंच्या अधिकाराचा नाही. कुलगुरूंना सद्या भीती वाटते आहे ती वेगळीच. विद्यापीठातील उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी 2 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2017 या कालावधीत नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर विमानाने केलेला दौरा. या दौऱ्याचे प्रयोजन तसेच या दौऱ्यासाठी त्यांना देण्यात आलेली अवाच्या सव्वा रक्कम. हा विषय दीड दोन वर्षांपासून गाजतो आहे. आता खरंच काही घोळ झाला का याची चौकशी करण्यासाठी डॉ. एफ.सी. रघुवंशी यांच्या आद्यक्षतेत चौकशी समिती गठीत करण्यात आली. डॉ. आर.एम.कडू, प्राचार्य ए. बी. मराठे, श्याम राठी आणि उपकुलसाचीव प्रवीण राठोड हे सदस्य असणाऱ्या समितीने चौकशी पूर्ण केली . हा चौकशी अहवाल सिनेट समोर येणे अपेक्षित असल्याने अहवालाची चिरफाड हमखास होणार. ही खरी भीती कुलगुरूंना असल्याचे बोलले जाते. या चौकशी अहवालात उपकुलसचिव सुजाता पाटील निर्दोष कशा आहेत हे स्पष्ट होत असताना सुलभा पाटील यांच्यासह 2017 मध्ये विद्यापीठात नियुक्त कर्मचाऱ्यांची भरती कशी वादग्रस्त आहे यावर अधिक भर दिला आहे. आणखी एक महत्वाचे उपकुलसचिव हे कुलगुरूंच्या अधिकारात काम करीत असताना जो काही गौडबंगाल सुलभा पाटील यांनी केला त्यासाठी कुलसचिवांनी मान्यता दिल्याचे अहवालात नमूद करण्याचा प्रयत्न झाला आहे. खरं तर त्यावेळी कुलसचिव असणारे दिवंगत डॉ.अजय देशमुख आता हयात असते आणि त्यांनी हा अहवाल पहिला असता तर आख्या चौकशी समितीचा बोऱ्या वाजला असता. अशा काही बाबी अहवालात नमूद आहे. हा चौकशी अहवाल आता सार्वजनिक झाला आहे. या अहवालाच्या आधारावर कुणी पोलीस तक्रार केली तर कुलगुरूंनसमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
असं काही अघटीत घडण्यापूर्वी आपला कार्यकाळ पूर्ण व्हावा अशा तयारीत कुलगुरू असावेत म्हणून त्यांनी आता चक्क कोरोनाचा आधार घेत विद्यापीठात आहे तितके दिवस आपल्याला सुखात जगता यावे असा सगळा प्रपंच केला आहे. संपूर्ण कोरोनाकाळात नागपूरला घरात सुरक्षित बसून असणाऱ्या कुलगुरूंनी प्रामाणिकपणे कुलगुरू म्हणून अमरावती विद्यापीठात किती काम केले हे सर्वांना ठाऊक आहे. अमरावती न रुळलेले, अमरावतीच्या मातीशी एकरूप होऊ न शकलेले डॉ. मुरलीधर चांदेकर हे खरोखर किती प्रामाणिक असावे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. विद्यापीठाने गुणपत्रिका वितरित केल्या नाही, अनेकांचे निकाल लागले नाही आशा अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करत असताना जिल्हाधिकारी काय म्हणतील याचा विचार कुलगुरुंना भेडसावत नाही मात्र सिनेट सभा घेणे म्हणजे नियमांचे उल्लंघन असे कुलगुरू मानतात. कुलगुरू खरंच नियमांचे किती पक्के आहेत आणि खरोखर किती प्रामाणिक आहेत हे त्यांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. आदिवासी कल्याणासाठी आपला पुढाकार असल्याचे सांगताना बांबू केंद्राची परिस्थिती काय तसे चांगले लाईट आणि पंखे काढून दुसरे बसविण्यात विद्यार्थ्यांचं काय हीत जोपासलं गेलं यावर पण प्रकाश पडायला हवा. इतके सारे आरोप होत असताना माझंच बरोबर इतकं बोलून चालणार नाही. सर्व बाबींचा खुलासा व्हायला हवा. खरं तर अमरावतीत मी परका अशी भावना असणाऱ्या कुलगुरूंना नागपूरला ताठ मानेने परतता यावं ही अपेक्षा.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments