Home महाराष्ट्र तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास गृहमंत्री घालत आहेत पाठीशी; भाजप युवा मोर्चाचे आरोप

तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास गृहमंत्री घालत आहेत पाठीशी; भाजप युवा मोर्चाचे आरोप

मुंबई

संभाजीनगरमध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाला गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्याऐवजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठिशी घातलं आहे. म्हणून आरोपीला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी केली.

राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत आहे. पत्रकार परिषदेत बसण्याचे धाडस करत आहे. हे केवळ गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. ज्यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, त्यावेळी पिडीतेवर कोणताही दबाव येऊ नये, पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये म्हणून आरोपीला तात्काळ अटक करून नंतर पुढची कारवाई केली जाते. ‘आरोपी असेन तर शिक्षा भोगण्यास तयार आहे’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले जाते. जर तुमची बाजू बरोबर असेल, तर गुन्हा दाखल होताच पोलिसांकडे स्वत:ला सुपूर्द का केले नाही? पोलिसांना तपासासाठी सहकार्य का केलं नाही? अशा पद्धतीने बाहेर मोकाट फिरून पिडीतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न का केला जात आहे? अशा परिस्थितीत असं दिसून येतं की आरोपी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने खुद्द गृहमंत्र्यांनीच कायद्याला बगल दिली आहे”, असा आरोप विक्रांत पाटील यांनी केला.राज्याचे, राज्यातील महिलांचे संरक्षण करणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. पण हे मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. ‘शक्ती कायदा’ लागू करून जर गृहमंत्रीच आरोपीचे रक्षण करणार असतील तर कायद्याची अंमलबजावणी तरी कशी होणार? राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सुप्रियाताई सुळे आणि रूपालीताई चाकणकर या अशा परिस्थितीत पिडीतेच्या बाजूने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजूने? या आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा खटला शक्ती कायद्यानुसार फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीतेला न्याय द्यावा”, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments