Home Video नव्या वर्षात राज्य सरकारला मिळावी सद्बुद्धी : देवेंद्र फडणवीस

नव्या वर्षात राज्य सरकारला मिळावी सद्बुद्धी : देवेंद्र फडणवीस

 

अमरावती –  राज्यात जे सरकार आहे त्या सरकारला नवीन वर्षामध्ये सुबुद्धी मिळावी आणि चांगले काम करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी इतकीच अपेक्षा असून राज्य व देशावरील संकट असे व्हावीत असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी सीमेवर शाहिद झालेल्या वीरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस शासकीय विश्राम भवन येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मी मुख्यमंत्री असताना पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेला निधी दिला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. उद्या पूर्णतः शासकीय कार्यक्रमात या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त मी उपस्थित राहणार असून, पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी एका मंचावर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एखादा आमदार एखाद्या व्यक्तीला भेटला तर तो त्या पक्षात जाणार, कोणी कोणाची भेट घेतली की तो व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जाणार, किंवा कोणी कार्यक्रमात आले की एकत्रित येणार. असा आपल्याकडे अलीकडच्या काळात फार संकुचित विचार चालला आहे अशी संकुचित विचार प्रणाली पत्रकारांनी सोडावी असा सल्लाही देवेंद्र फडनवीस यांनी दिला. राज्यातील महिला अत्याचारांबाबत सरकार गंभीर नसल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments