Home विदर्भ शहीद कैलास कालुजी दहिकर यांच्या कुटुंबियांना खासदार नवनीत राणा यांची आर्थिक मदत,सहा...

शहीद कैलास कालुजी दहिकर यांच्या कुटुंबियांना खासदार नवनीत राणा यांची आर्थिक मदत,सहा महिन्याचे वेतन दिले

अमरावती

चीनच्या सीमेवर शून्य डिग्री तापमानात देशासाठी कर्तव्य बजावत असतांना आगीत होरपळून शहीद झालेल्या कैलास कालुजी दहिकार यांच्या कुटुंबियांना खासदार सौ नवनीत जी रवि राणा यांनी आपले सहा महिन्यांचे वेतनाचे वेतन मदत म्हणून जाहीर केले. या आर्थिक मदतीचा धमदेश माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दहिकर कुटुंबियांना बहाल करण्यात आले.

या कार्यक्रमात अशोक भुयार या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नी कल्पना अशोकराव भुयार ,स्व वैभव अरूणराव समरीत यांच्या आई नीलिमा समरीत, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी रवींद्र विरुळकर यांना सुद्धा आर्थिक मदत म्हणून धनादेश चे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार रवि राणा, माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे, माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख, विनोद जायलवाल ,संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे,सुमती ढोके, ज्योती सैरिसे ,सपना ठाकूर ,आशिष गावंडे ,नितीन बोरेकर जयंतराव वानखडे, राय काका, विनोद गुहे सचिन भेंडे, निलेश भेंडे, रवी आडोकार , अजय मोरया ,, मिलिंद काहाळे, पराग चिमोटेभाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता ताई चौधरी, किरण पातूरकर, कुसुम साहू ,राधा कुरील, प्रणय कुलकर्णी, ललित संमदूरकर, इत्यादी हजर होते

 

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments