Home विदर्भ हातुर्णा येथे वृद्ध महिलेची हत्या; आरोपीला अटक

हातुर्णा येथे वृद्ध महिलेची हत्या; आरोपीला अटक

अमरावती

जिल्ह्यात वरुड तालुक्यातील हातुर्णा येथील ९० वर्षीय महिलेची दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. आलोकाबाई रामटेके (९०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी खुशाल ऊर्फ छोटू माहुरे (१९, हातुर्णा) याला अटक करण्यात आली.

बेनोडा पोलिसानुसार, आलोकाबाई या एकट्याच राहत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी खुशालने वृद्धेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पैसे न दिल्याने तिला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना माहिती देण्यात आली. एसडीपीओ कविता फरतडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीची शोध चालविला. अखेर बहादा येथून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments