Home देश नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम

नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम

दिल्ली

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. आता चालू वर्ष संपून उद्यापासून नवं वर्षही सुरु होईल या नवीन वर्षातही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम राहणार आहे. त्यामुळेच सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सिंघू बॉर्डवर २५ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचे आंदोलनाचं व्यवस्थापन करणारे हरजिंदर सिंग म्हणाले, “जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमच्यासाठी नवं वर्ष नसेल.”बुधवारी झालेल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात सरकारने वाढते वीजदर आणि पेंढा जाळल्याबद्दल दंड याबद्दल शेतकर्‍यांच्या चिंतेकडे लक्ष वेधले होते. परंतु अद्याप ती साजरी करण्यासाठी पुरेशी चांगली बातमी नव्हती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अद्याप निराकरण न झालेल्या मुद्द्यांपैकी नवीन शेती कायदे रद्द करणे आणि त्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणं बाकी असल्याचंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.सरकारने मान्य केलेल्या दोन्ही मागण्या हे काही कायदे नाहीत त्यांचा परिणाम अजून जाणवलेला नाही. आमच्या मागण्या आम्ही स्पष्टपणे सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यावर सरकार त्यांच्या आवडीनुसार त्या निवडू शकत नाही. सरकारला आमचं सर्व ऐकावचं लागेल,” असं पंजाबच्या होशियारपूर येथील शेतकरी हरेश सिंह यावेळी म्हणाले.जर सरकारला आमची क्षमता पहायची आहे तर आम्ही त्यांना ती दाखवून देऊ. आमच्यासारखे लोक जे कोठींमध्ये राहतात ते सध्या रस्त्यावर झोपत आहेत. आम्ही गेल्या महिन्याभरापासून शांततेनं आंदोलन करत आहोत. पुढील वर्षभरासाठी देखील आम्ही आंदोलन करु शकतो,” असं भुपिंदर सिंग नावाच्या एका शेतकऱ्यानं म्हटलं आहे.

नव्या वर्षात कुटुंबापासून दूर असल्यानं अनेक शेतकऱ्यांना नव्या वर्षाचं स्वागत करता येणार नाही, मात्र याची त्यांनी कसलीही तक्रार केलेली नाही. याबाबत सांगताना हरजिंदर म्हणतात,” आमच्या घरी कुटुंब आहे, त्यांची आम्हाला आठवण येत आहे. पण हे शेतकरीही आमचं कुटुंब आहे.” गुरप्रित हायर यांनी ठरवलं की नव्या वर्षात आम्ही शेतकऱ्यांसाठी सेवा देणार आहोत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments