Home विदर्भ वादग्रस्त प्रा.अनिलकुमार सौमित्र अमरावतीमध्ये नकोत

वादग्रस्त प्रा.अनिलकुमार सौमित्र अमरावतीमध्ये नकोत

अमरावती

केंद्र सरकार संचालित इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती प्रादेशिक केंद्राचे नवनियुक्त संचालक प्रा. अनिलकुमार सौमित्र यांच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला होता. शेतकरी नेते, गांधीवादी चंद्रकांत वानखडे यांचेसह अमरावती विद्यापीठाच्या जनसंवाद विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन नाखले यांनी सौमित्र यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना फादर ऑफ पाकीस्तान असे वादग्रस्त विधान करणाऱ्या सौमित्र अमरावतीमध्ये नकोच अशी भूमिका त्यांनी आज पत्रपरिषदेद्वारे जाहीर केले. याविरोधात लढा देण्याचाही संकल्प त्यांनी घेतला आहे.
प्रा. अनिलकुमार सौमित्र यांची नुकतीच इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (आयएमसी)च्या संचालक पदावर नेमणूक केंद्र सरकारने केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी नुकताच पद्भार स्वीकारला आहे. मात्र सौमित्र यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शेतकरी नेते, गांधीवादी चंद्रकांत वानखडे यांचेसह अमरावती विद्यापीठाच्या जनसंवाद विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन नाखले यांनी आज शुक्रवारी श्रमिक पत्रकार भवन येथे याबाबत पत्रपरिषद घेवून प्रा. अनिलकुमार सौमित्र यांच्या नियुक्तीस विरोध दर्शविला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन केंद्राचे संचालक म्हणून प्रा. अनिल सौमित्र यांची नेमणूक झाली आहे. देशभरात आयएमसीचे पाच केंद्र असून त्यापैकी अमरावतीमध्ये एक आहे. विद्यापीठाच्या परिसरात स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याखासदार निधीतून बांधलेल्या स्मृति प्रित्यर्थ भवनात केंद्र आहे. संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या किर्तनातून संत कबीर, संत तुकाराम, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबडकर या महापुरुषांचे दाखले देऊन समाजाचे प्रबोधन केले आहे. त्यांचे नाव असलेल्या संस्थेच्या परिसरात महात्मा गांधी व अन्य समाजाविषयी बेताल विधाने करणाऱ्या प्रा. अनिल सौमित्र यांची नेमणूक करणे चुकीचे असल्याचे चंद्रकांत वानखडे यांनी यावेळी म्हटले.
आयएमसीमध्ये पत्रकारिता शिकविले जात असते. महात्मा गांधी व अन्य समाजाविषयी तेढ निर्माण करणारे विधान करणारे सौमित्र विद्यार्थ्यांना कोणते धडे देणार हा प्रश्न आहे. जनसंवाद विषयासारख्या शिक्षण क्षेत्रात असे नतभ्रष्ट, गांधी द्वेषी प्राध्यापक विद्यार्थ्यांना द्वेष व मत्सर आणि राग शिकवणार याची ही चुणूक आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांना देखील याबाबत माहीती देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र देऊन प्रा. सौमित्र यांची अमरावतीमधून हकालपट्टी करावी यासाठी आग्रह करण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेला वरिष्ठ पत्रकार प्रा.डॉ. कुमार बोबडे, संवाद तज्ञ प्रा. आनंद मांजरखेडे, डॉ. अरूण मानकर, प्रा.डॉ. जयसिंगराव देशमुख उपस्थित होते.

 

००००००००००००००

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments