Home ताज्या घडामोडी जानेवारीपासून भारत- ब्रिटन विमानसेवा होणार सुरू

जानेवारीपासून भारत- ब्रिटन विमानसेवा होणार सुरू

दिल्ली
भारत आणि ब्रिटनमधील विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली असून ८ जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना संमती देण्यातली आहे. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
करोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्याने २३ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत भारत ते ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान ८ ते २३ जानेवारी दरम्यान मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादसाठी आठवड्याला फक्त १५ उड्डाणांना संमती देण्यात आल्याचंही पुरी यांनी सांगितलं.देशात करोनाचा आलेख खालावत असतानाच दुसरीकडे ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण देशात आढळत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून २३ डिसेंबरपासून ब्रिटन आणि भारत यांच्यातील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आधी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती मात्र त्यानंतर ती वाढवून ७ जानेवारीपर्यंत करण्यात आली. आता ८ जानेवारीपासून भारत-ब्रिटनमधील विमान सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये २० हजारांच्या आसपास राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २० हजार ३५ इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर मागील २४ तासांमध्ये २३ हजार १८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या ३५ दिवसांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिली आहे त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येते आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments