Home ताज्या घडामोडी शिवशाही बसमध्ये चांदी; बस पोचली पोलीस ठाण्यात

शिवशाही बसमध्ये चांदी; बस पोचली पोलीस ठाण्यात

अमरावती

पुण्याहून निघालेल्या शिवशाही बसमधील एका सीटवर ठराविक अंतराने प्रवासी बदलत होते. मात्र, लगेज अमरावतीहून बस निघाल्यानंतरही कायम होते. अखेर चालक आणि वाहकाने लगेज तपासले असता त्यात चांदी असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आणि चालकाने बस थेट फ्रेजपुरा पोलीस ठाण्यात आणल्याने खळबळ उडाली.

पोलीस सूत्रांनुसार, पुणे-नागपूर शिवशाही बस (एमएच ०९ ईएम १२९३) ने चालक मुकेश हुकरे (रा. चंदननगर, नागपूर) व वाहन मोहन पडोळे (रा. नागपूर) हे परतीच्या मार्गावर होते. या बसमध्ये पुण्याहून एक बॉक्स व दोन बॅग असे लगेज घेऊन एक व्यक्ती बसला. तो अकोल्याला उतरला तरी त्याने लगेज सोबत नेले नाही. त्याच सीटवर तेथून अमरावतीकरिता एक व्यक्ती बसला. त्यानेही ते लगेज जैसे थे ठेवले. अमरावतीहून त्याच सीटवर आणखी एक युवक नागपूरकरिता बसला.

चालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नागपूर मार्गाहून बस थांबवून त्या सीलबंद लगेजची तपासणी केली आणि नजीकच्या पोलीस ठाण्याची माहिती नसल्याने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापुढे बस थांबविली. गुन्हे शाखेने प्राथमिक तपासणी करून बस फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणली. तेथे लगेजसोबत असलेला प्रवासी पंकजसिंह सुधीरसिंह तोमर (२६, रा. ग्राम अनमोल, डोडोरी, ता. कोरसा, जि. मुरैना, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची पुढील चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगरे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत. आबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले असून, या लगेजमध्ये चांदीचे दागिने असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments