Home ताज्या घडामोडी सत्यशोधक सावित्रीबाई फुले

सत्यशोधक सावित्रीबाई फुले

 

डॉ प्रवीण बनसोड

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते
पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने स्वताचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली .शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले .

ज्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत, सर्वांचे जीवन सुलभ, शिक्षित होऊन जीवनमानात सुधार व्हावा यासाठीच लढा दिला अशा खऱ्या खुऱ्या निस्वार्थी थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामान्य जनांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात प्रभावी व महत्त्वाचा लढा दिला,
त्यावेळी मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध होता व त्यांना मनुस्मृती या ग्रंथानुसार ताडन च्याच अधिकारी मानल्या जायचे, चुल आणि मूल सांभाळत गुलामासारखे वागावे लागायचे. ज्योतिबांनी प्रथम सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यानंतर सावित्रीमाईंचा अविरत संघर्षमयी लढा सुरु झाला होता. सावित्रीबाईंनी सर्व मुलींना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला, पण त्यावेळी असे समाजकार्य करणे सोपे नव्हते. समाजकंटक लोकांनी सावित्रीबाईंना त्रास देणे, अडथळे निर्माण करणे सुरू केले. दगड, माती, शेण, विष्ठा सावित्रीबाईंना फेकून मारायचे पण सावित्रीबाई त्यांच्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहित. त्या शाळेत शिकवायला जाताना एक जास्तीची साडी सोबत घेऊन जायच्या. याव्यतिरिक्त त्यांनी विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारणाचे व आद्य कवयित्री म्हणून कार्य केले. सावित्रीमाई जर नसत्या तर आजही स्त्रियांचे जीवन गुलामासारखेच राहिले असते. म्हणून त्यांचे आभार प्रत्येक स्त्रिने मानलेच पाहिजे. पण आजही स्त्रियांना मानसिक गुलाम बनवून ठेवण्यासाठी काल्पनिक व अंधश्रद्धेने बरबटलेल्या थोतांड व्रत वैकल्यामध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान होत राहते. आणि याद्वारे काहि समाजकंटक लोक आपला व्यवसाय चालवितात. पण यामध्ये गुंतलेल्या स्त्रियांना डोळस व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्टिची चिकित्सा केली पाहिजे. जसे कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असल्यास स्त्रिया निरखून पारखून विश्वास बसल्यावरच घेते तसेच कोणतीही कहाणी, व्रत वैकल्ये निरखून पारखून चिकित्सा करूनच स्वीकारावी. व इतरांनाही यांपासून परावृत्त करावे. पण आता स्त्रि सक्षम आहे, पुरुषांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आणि यशस्वी आहे. नवनिर्मितीचे कौशल्य स्त्रियांमध्ये आहे. कुठलीही गोष्ट पटकन समजून घेऊन त्यात पारंगत होण्याइतपत कुशलता आहे. म्हणून सर्वांनी भारतीय समाजमुक्तीचा लढा समजून घेतला पाहिजे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments