Home महाराष्ट्र मेळघाटातील गंभेरीच्या विद्यार्थ्यांना मिळतेय ‘प्रतिभा’संपन्न शिक्षण

मेळघाटातील गंभेरीच्या विद्यार्थ्यांना मिळतेय ‘प्रतिभा’संपन्न शिक्षण

ब सवित्रीमाई फुले जयंती विशेष

श्रीनाथ वानखडे

अमरावती


ज्योती सावित्रीचे एकच स्वप्न…चला खरे तर बनवूया…अक्षर अक्षर जुळवूया .. ज्ञानदीप हा उजळूया या स्वरचित काव्याप्रमाणे धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गंभेरी येथील प्रतिभा काठोळे (झळके) ह्या शिक्षिका विद्यादानाचे काम करत आहे.आजच्या या सावित्रीच्या लेकीने शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी विषयात तर पारंगत बनविले आहे सोबत स्वतः ही येत्या दीक्षांत समारंभात मराठी विषयात आचार्य पदवी (पी.एच.डी )मिळवणार आहे.
सन २००१ मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या प्रतिभा काठोळे यांनी वरुड येथील बोरगाव व जरुड कन्या शाळेत कार्य करतांना त्यांचे १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.त्यानंतर सन २०१६ मध्ये धारणी तालुक्यातील गंभेरी शाळेत स्थानांतर झाले.पूर्वी या शाळेतील विद्यार्थी केवळ स्थानिक भाषेतच बोलत होते आता मात्र त्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेसह मराठी व इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविले आहे.आज त्यांच्या वर्गातील ९० % विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय समजत असून ७५ % विद्यार्थी अस्खलितपणे संवाद साधतात.कोरोना काळातही काठोळे दांपत्याने स्थानिक भागात वास्तव्य करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

अष्टपैलू शिक्षिका


स्वतः मराठी विषयात एम.फील व पी.एच डी शिक्षण घेतले तरी प्रतिभा यांचा आवडीचा विषय इंग्रजी आहे.सेवेच्या सुरुवातीच्या सात वर्ष त्यांनी इंग्रजी प्रशिक्षण तज्ञ म्हणून कार्य केले.कविता लेखन,गायन,कार्यक्रम संचालन,विद्रोही काव्य लेखन,कुशल अध्यापना सोबतच दोन कादंबरीचे समीक्षक लेखक म्हणून कार्य केले आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम दरम्यान त्यांनी स्वतः ‘शिक्षण हक्क’ अंतर्गत सर्व विषयांचे समावेश असलेल्या दोन सुंदर गाण्याची निर्मिती सह गायनही केले आहे.

५३ उपक्रमांची शाळा

  • केवळ विद्यार्थ्यांसाठी कार्यमग्न असणाऱ्या ह्या शिक्षिकेला पुरस्कारात रुची नसून विद्यार्थ्यांची गुणवत्ता खरी कमाई असल्याचे त्या सांगतात.गंभेरी च्या शाळेतील उपक्रमामध्ये रेषा अक्षर,सूचक शब्द,ओळखा पाहू,अनुलेखन,आगगाडी इंजिन ,सुंदर लिहा व गा,शारीरिक शिक्षणाकरिता डोंगराला आग लागली,इंग्रजीत कृती व वाचन,पहा व बोला,आध्याक्षरांची शब्द साखळी,मी अन्ड माय फमिली,पिक्चर रीडिंग कृती,डू अॅन्ड डोन्ट अॅक्टीविटी आदी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून येथील विद्यार्थी ‘प्रतिभा’संपन्न होत आहे.
- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments