Home विदर्भ सावित्रीबाई फुले जयंती : जेतवन ग्रुप तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

सावित्रीबाई फुले जयंती : जेतवन ग्रुप तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

अमरावती
सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून कोरोना कालावधीत ज्या लोकांनी पुढाकार घेवून समाजाची सेवा केली अश्या कोविड योद्ध्यांचा सत्कार आज शेगाव येथे करण्यात आला.स्थानिक परिसरातील जेष्ठ नागरिक जेतवन (मॉर्निंग ) ग्रुप शेगाव तर्फे सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर शेगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देव आठवले हे होते.

आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश होते.त्यामुळे कोरोना च्या कठीण कालावधीत ज्या महिला योद्धांनी पुढाकार घेवून समाजाची सेवा केली अश्या अधिपरिचारिका (नर्सेस) डॉक्टर, सफाई कामगार,आशाताई,अंगणवाडी सेविका,पोलीस,आरोग्य सेविका सह आदी ५० योद्धांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाला वक्ते म्हणून प्रा.प्रफुल कडू,देव आठवले,प्रा.अशोकराव अर्डक,रजनीताई आमले,नगरसेविका वंदनाताई मडघे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी कोरोना कालावधीत आलेल्या विविध समस्यांचा सामना कोविड योद्धांनी कसा केला याचे जिवंत अनुभव सत्कारमूर्तीनी यावेळी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाला समूह संघटिका प्रतिभा वानखडे,नगरसेवक विजय वानखडे,गोपाल धर्माळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिपरिचारिका वैशालीताई खोडस्कर,रहाटगाव येथील डॉ.उज्वला टांक,पोलीस शिपाई ज्योती खवले,तसेच श्रीमती ठाकरे,सुनीता डेहणकर,श्रीमती इंगोले,समाज सेविका रजनीताई आमले,संगीता वानखडे,श्रीमती मेश्राम आदीसह ५० कोविड योद्धांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी संकल्प एक हात मदतीचा या संस्थेद्वारे गरजू व्यक्तींना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील प्रमिला सुखदेवे,लता दहीकर,पद्मा नवाडे,श्रीमती हरणे,श्रीमती बागडे,श्रीमती मोंढे,श्रीमती लोणारे,श्रीमती शेंडे,आदींसह अशोकराव सुखदेवे,श्री गवई,गजानन वानखडे,श्री मिसाळ श्री मोंढे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन डॉ.डी.एस.नवाडे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments