Home ताज्या घडामोडी पुण्यात तरुणीवर बलात्कार

पुण्यात तरुणीवर बलात्कार

पुणे

येथील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणी रात्रीच्या सुमारास कॉल सेंटरमधील ड्युटी संपल्यानंतर घरी जात होती. एका तरूणाने तिचे अपहरण केले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. ती गुरुवारी रात्री काम झाल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी एका तरूणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिला गाठत मारहाण केली. नंतर बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे तरुणीवर आरोपीनं बलात्कार केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले. झालेल्या घटनेनं तरुणी हादरून गेली. त्याच अवस्थेत तरुणीने तात्काळ घडलेली घटना मित्राला फोन करून सांगितली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानुसार तक्रार दाखल करून घेतली. घटना घडलेल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला काही तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले. या घटमेमुळे पुणे शहर हादरले असून राज्यभर खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments