Home ताज्या घडामोडी स्मशानभूमीचे छत कोसळले; 18 ठार

स्मशानभूमीचे छत कोसळले; 18 ठार

गाझियाबाद

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर श्मशानघाटात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीचे छत कोसळून १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्यात दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर आणि दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ही दुर्घटना घडली आहे. मुरादनगरच्या स्मशानघाट परिसरात लिंटरचे बांधकाम सुरू होते. या वेळी पाऊस आल्याने लिंटर खाली कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या दुर्घटनेचे शिकार झालेले लोक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आले होते.
एका फळविक्रेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाऊस आल्याने लोक छताखाली उभे राहिले होते. या छताचे बांधकाम सुरू होते. मुसळधार पावसामुळे हे छत खाली कोसळले आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक छताखाली दबले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments