Home ताज्या घडामोडी राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे आज सकाळी सातारा येथे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गेली पाच दशके उंडाळकर यांनी सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात कार्य केले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान १२ वर्षे त्यांनी विविध खात्यांची मंत्रीपदेही भूषविली होती. पुरोगामी आणि काँग्रेसचे निष्ठावंत मंत्री म्हणून त्यांची ओळख होती.

विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना सहकार खाते, दुग्धविकास व पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्यांचे मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली होती. सलग 35 वर्षे ते कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्यत शोककळा पसरली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments