Home विदर्भ सालबर्डी यात्रास्थळी राबविले महास्वच्छता अभियान

सालबर्डी यात्रास्थळी राबविले महास्वच्छता अभियान

अमरावती

जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या सालबर्डी येथे पंचायत समिती स्तरावरिल सर्व कर्मचारी यांनी सालबर्डी यात्रास्थळाचा परिसर श्रमदानातून चकाचक केला. परिसर स्वच्छते नंतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्लास्टीक मुक्तीसह, हरित शपथ सुध्दा घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदेशनात हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे त्यांच्या परिवारासह श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महादेव दर्शना करिता गेले असता त्यांना त्यांना आढलेल्या विविध बाबीच्या निरिक्षणा नुसार अमोल येडगे यांनी संबधीत गट विकास अधिकारी रामकृष्ण पवार यांना योग्य त्या सोयी-सुविधे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या पैकी परिसर स्वच्छता ही एक महत्वाची सुचना होती. या बाबीवर गट विकास अधिकारी रामकृष्ण पवार यांनी लगेच तोडगा काढूत पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना सालबर्डी यात्रा परिसराच्या ठिकाणी एकत्र बोलवून यात्रेचा संपुर्ण परिसर महास्वच्छता अभियान राबवून कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून कचरामुक्त केला आता हा संपुर्ण परिसर स्वच्छ व चकाचक दिसत आहे. सोबत निसर्गाचे सौदर्या यामूळे हा परिसर आता अधिकच देखणा दिसू लागला आहे.

महास्वच्छता अभियाना नंतर सर्व कर्मचाऱ्यांन प्लास्टीकमुक्तीसह हरित शपथ सुध्दा घेतली. यावेळी पंचायत समिती चे सभापती यादवरावजी चोपडे, गट विकास अधिकारी, रामकृष्ण पवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, पंचायत समिती सदस्य सुनिल कडू, रमेश खातदेव व इतर सदस्य, गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरिल सर्व खाते प्रमुख, समस्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका सर्व, स्वच्छाग्रही, सालबर्डी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व पंचायत समिती मोर्शी येथील समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments