Home ताज्या घडामोडी मुंबईत थरार ; युवतीच्या डोक्यात गोळी झाडून युवकाने केली आत्महत्या

मुंबईत थरार ; युवतीच्या डोक्यात गोळी झाडून युवकाने केली आत्महत्या

मुंबई

डोक्यावर गोळी झाडून युवतची हत्या करण्यात आली आहे. २६ वर्षीय युवतीची हत्या केल्यानंतर युवकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सोमवारी मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या मागे रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधात वितुष्ट आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबारानंतर काही स्थानिकांनी कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर दोघांनाही कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे दाखल होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दोघांच्याही कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीची हत्या केल्यानंतर युवकाने मंदिरात स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांचीही ओळख पटली असून राहुल यादव आणि निधी मिश्रा अशी त्यांची नावं आहेत. राहुल हा कांदिवलीचा तर निधी मालाडची रहिवासी होती. निधी मिश्राचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत साखरपुडा झाला होता. याच कारणामुळे राहुलने तिच्यावर गोळीबार करुन हत्या केली असावी,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments