Home ताज्या घडामोडी ब्रिटन लॉकडाऊन !

ब्रिटन लॉकडाऊन !

लंडन

पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडानची घोषणा केली आहे. जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली.

ब्रिटनमध्ये मृत्यूदर जास्त असल्या कारणाने आधीच जवळपास चार कोटी जनतेला कडक निर्बंधांमध्ये रहावं लागत आहे. ब्रिटन कोरोनाला आळा घालण्यात अपयशी ठरलं असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी करोनाच्या नव्या प्रकाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे.बेरिस जॉन्सन यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले जवळपास २७ हजार लोक रुग्णालयात दाखल असून एप्रिलच्या पहिल्या महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती त्याच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. गेल्या मंगळवारी फक्त २४ ता सांत ८० हजार लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.देशात अद्यापही अनेक ठिकाणी कडक निर्बंध असताना कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे अजून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन केला पाहिजे,” असं बेरिस जॉन्सन यांनी सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments