Home ताज्या घडामोडी सरकारी दलाल असल्यासारखे वागू नका; मनसेचा पोलिसांवर रोष

सरकारी दलाल असल्यासारखे वागू नका; मनसेचा पोलिसांवर रोष

मुंबई

वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसंच सरकारी दलाल असल्यासारखे वागू नका सांगताना आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाची आठवण करुन दिली.

मनसेचा इशारा

“आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

असे आहे प्रकरण
परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मनसे कार्यकर्त्यांकडून “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणा देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याची पोलिसांना कुणकूण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतलं होतं. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments