Home ताज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांना चीनमध्ये प्रवेश नाही; 'WHO' ने व्यक्त केली नाराजी

आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांना चीनमध्ये प्रवेश नाही; ‘WHO’ ने व्यक्त केली नाराजी

जेनिव्हा

चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

चीनमधील वुहान येथे करोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर याची चाचपणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. “चीनमधील अधिकाऱ्यांनी अद्यापही अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी गरज असणाऱ्या सर्व परवानग्या घेतल्या नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,” असं ट्रेडोस यांनी म्हटलं आहे.

ट्रेडोस म्हणाले, “मी चीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून हे मिशन जागतिक आरोग्य संघटनेची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं आहे”. प्राण्यांच्या आजारावरील तज्ज्ञ पीटर यांच्या नेतृत्वात ही टीम काम करणार आहे. जुलै महिन्यात पीटर चीनममध्ये प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी गेले होते.दुसरीकडे चीन करोनाची नेमकी कुठून आणि कशी सुरुवात झाली याची माहिती गोळा करत आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून करोनाचा प्रसार होणारी ठिकाणं वेगवेगळी असल्याचं समोर येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

चीनवर वारंवार करोनाला योग्य प्रकारे हाताळलं नसल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील चीनवर जाहीरपणे करोनाचा फैलाव केल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेल्या अमेरिकेने पारदर्शकपणे संपूर्ण तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments